Friday, March 11, 2016

पोलीस पद भरती प्रक्रिया पोलिस भरती 2016 महाराष्ट्र पोलिस भरती 2016 पोलिस भरती 2015-16 पोलिस भरती प्रश्न पत्रिका पोलिस भरती माहिती maharashtra police bharti पोलिस भरती २०१६ police recruitment

पोलीस पद भरती प्रक्रिया


महाराष्ट्रामधील लोकसंख्येचा हजार प्रमाणास दोन पोलीसांची आवश्यकता आहे. दरवर्षी लोकसंख्या वाढ त्याचबरोबर सेवेत असलेल्या पोलीसांचे प्रमाण निवृत्तीने कमी होते. त्याकरिता दरवर्षी जानेवारी व जून या दोन महिन्यात पोलीस भरती आवश्यकता व नियमानुसार केली जाते. काय म्हणता राव ! आपल्यामध्ये उत्साह, उमेद, जोश आहे. तर चला, पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई म्हणून स्वतःचे उज्वल करिअर बनविण्याची संधी घेऊया व जनतेची सेवा, देशाची सेवा व कायदा सुव्यवस्था सांभाळूया.
    आपणास पोलीस शिपाई कसे होता येईल ?
    त्याकरिता कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ?
    कोणती शैक्षणिक अर्हता व शारिरीक पात्रता असणे आवश्यक आहे ?
    पोलीस शिपाई पदी नियुक्ती होण्यापर्यंतची प्रकिया निवड पद्घती काय आहे ?
    ती कोठे, कशी, कधी होते ?
असे अनेक प्रश्न आपल्या मनात येउन जातात. तर चला त्याची उत्तरे खाली  मिळवा.
शैक्षणिक अर्हता
शारिरीक पात्रता
अर्जाचा नमुना
अर्ज करतांना अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
निवड पध्दती
शासन निर्णय
शैक्षणिक अर्हता
       महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळे अधिनियम १९६५ ( १९६५ चा महाराष्ट्र अधिनियम ४१ ) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परिक्षा अथवा या परिक्षेस समकक्ष म्हणून घोषीत केलेली परिक्षा उत्तिर्ण होणे आवश्यक आहे.
       परंतू नक्षलग्रस्त भागात किमान शैक्षणिक पात्रतेचे पुरेसे उमेदवार मिळत नसतील तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एस.एस.सी.) उत्तीर्ण झालेले उमेदवारही घेतले जातात.
शारिरीक पात्रता
अ.क्र.तपशिलपुरूष उमेदवारांसाठीमहिला उमेदवारांसाठी
वय१८ ते २५ वर्षे (मागास वर्गीय उमेदवारांसाठी ३० वर्षांपर्यंत)१८ ते २५ वर्षे (मागास वर्गीय उमेदवारांसाठी ३० वर्षांपर्यंत)
उंची१६५ सें.मी.१५५ सें.मी.
छाती७९ सें.मी. न फुगवता (किमान ५ सें.मी. छाती फुगवणे आवश्यक आहे.)----
वजन५० कि.ग्रॅम४८ कि.ग्रॅम
राज्य राखीव पोलीस दल (फक्त पुरूष उमेदवार)
वय१८ ते २५ वर्षे (मागास वर्गीय उमेदवारांसाठी ३० वर्षांपर्यंत)
उंची१६८ सें.मी.
छाती७९ सें.मी. न फुगवता (किमान ५ सें.मी. छाती फुगवणे आवश्यक आहे.)
वजन५० कि.ग्रॅम
अर्जाचा नमुना
पोलीस पदासाठी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिध्द केली जाते.
तुम्ही वर्तमान पत्रामध्ये जाहिरातीचा जो नमुना दिलेला आहे त्या नमुन्यामध्ये व दिलेल्या विहित वेळेत नियुक्ती अधिका-यांकडे अर्ज सादर करावा.
अर्जासोबत काही कागदपत्रे जोडणे आवश्यक असेल तर ती कागदपत्रे तुम्ही अर्जास जोडावीत.
अर्जातील प्रत्येक रकान्यातील माहिती काळजीपूर्वक भरून अर्ज सादर करावा.
सोबत तुमच्या माहितीसाठी अर्जाचा नमुना दिलेला आहे. तो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करतांना अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे
    शारिरीक पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र / गुणपत्रकाची छायाप्रत.
     जन्मतारखेचे प्रमाणपत्र / शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत.
    प्राधिकृत अधिका-याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची छायाप्रत.
    उमेदवार आर्थिकदृष्टया मागासवर्गीय असल्यास प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची छायाप्रत.
    उमेदवार प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त / भुकंपग्रस्त असल्यास त्याबाबत प्राधिकृत अधिका-याच्या दाखल्याची छायाप्रत.
    सेवायोजन कार्यालयांत नावनोंदणी केल्याबाबत ओळखपत्राची छायाप्रत.
निवड पध्दती

यामध्ये उंचीचे मोजमाप घेतले जाते व पात्र उमेदवारांची निवड केली जाते.

यामध्ये छातीचे मोजमाप घेतले जाते व पात्र उमेदवारांची निवड केली जाते.

यामध्ये प्रमाणपञांची तपासणी केली जाते. व पात्र उमेदवारांची निवड केली जाते.

यामध्ये पायरीमध्ये पोलीस उपआयुक्त , पोलीस उपअधिक्षक(गृह) किंवा विभागीय पोलीस अधिकारी यांनी उमेदवारांच्या उंचीचे व छातीचे मोजमाप फेर घेतले जाते. व उमेदवारांना क्रमांक दिले जातात.

यामध्ये शारिरीक चाचणी घेतली जाते. १०० मीटर धावणे - १० गुण, लांब उडी - १० गुण, उंच उडी - १० गुण, गोळा फेक - १० गुण, ८०० मीटर धावणे - २० गुण, पुल अप्स - १० गुण, दोर चढणे - १० गुण, अडथळा - २० गुण असतात. शारिरीक चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५० गुण मिळविणे आवश्यक असते.

या पायरीमध्ये मागील पात्र ठरलेल्या उमेदवारांची ८० गुणाची लेखी चाचणी घेतली जाते. त्यामध्ये चालू घडामोडी (२० गुण), सामान्य ज्ञान (२० गुण), अंकगणित (२० गुण) व निबंध लेखन (२० गुण) असे चार विषय असतात. लेखी चाचणीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४० गुण मिळविणे आवश्यक असते.

या पायरीमध्ये लेखी चाचणीत उत्तीर्ण होणा-या उमेदवारांची तोंडी चाचणी घेतली जाते. या चाचणीमध्ये किमान गुण मर्यादा नसते.

या पायरीमध्ये खेळातील अती उत्कृष्ट अस्सल पुराव्यांची प्रमाणपत्रांची पडताळणी करुन निवड समीतीचे अध्यक्ष २५ गुण जादा देतात.

या पायरीमध्ये उमेदवारांनी शारिरीक, लेखी, तोंडी मिळविलेल्या गुणांची पोलीस उपआयुक्त , पोलीस उपअधिक्षक(गृह) किंवा विभागीय पोलीस अधिकारी हे स्वतः जिल्हा भरती नोंदवहीत नोंद घेतात व उमेदवारांनी प्राप्त केलेल्या एकूण गुणांची बेरिज करुन गुणवत्ता यादी तयार करतात.
१०
या पायरीमध्ये जे उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या निवडीस पात्र होतील त्यांची संवर्ग निहाय १०० बिंदू नामावली नुसार मागास वर्गीयांचे अनुशेष विचारात घेऊन निवड यादी बनविण्यात येते.
११
या पायरीमध्ये निवड करण्यांत आलेल्या उमेदवारांच्या १० टक्के इतक्या उमेदवारांची प्रतिक्षा यादी बनविली जाते. ही यादी फक्त त्या भरतीमधील निवड झालेले उमेदवार पदावर हजर न झाल्यास लागू राहते.
१२
या पायरीमध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची वैद्यकिय तपासणी करण्यात येते.
१३
या पायरीमध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची आरक्षित पदानुसार पोलीस शिपाई म्हणून साक्षांकन नमूना व चारित्र्य पडताळणीच्या आधीन राहून नेमणूक केली जाते.
१४
या पायरीमध्ये नेमणूक देण्यात आलेल्या उमेदवारांची साक्षांकन नमूना व चारित्र्य पडताळणी त्यांच्या नेमणूकीनंतर १ महिन्याच्या आत करण्यात येते.