झटपट पदार्थ झटपट रेसिपी झटपट नाश्ता रेसिपी नाश्ते के व्यंजन झटपट पाककृती निशा मधुलिका की रसोई nisha madhulika recipe in hindi language निशा मधुलिका की रेसिपी
कामं खूप आहेत, आज बाई आली नाही, ऑफिसमध्ये लवकर जायचंय किंवा उठायला उशीर झाला.. म्हणून नाश्ता केला नाही, स्वयंपाक केला नाही असं होत नाही. स्वयंपाकाचं आटोपून नाश्ता करणं म्हणजे अनेकींसाठी तारेवरची कसरत असते. नाश्ता तर हवा पण अगदी दहा-पंधरा मिनिटांत बनेल आणि सर्वांना आवडेल असं काय करता येईल या शोधात अनेक बायका असतात. घाईगर्दीत नाश्त्यासाठी म्हणून करता येतील असे भरपूर पदार्थ आहेत.
बाई नोकरदार असो नाहीतर गृहिणी तिच्यामागे कामाचे व्याप असतातच. प्रत्येक कामाला तिला न्याय हा द्यावाच लागतो. सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण ही तीन कामं तिला रोज न चुकता पार पाडावीच लागतात आणि तीही हाताची चव कायम ठेवून. कारण प्रश्न तिच्या एकटीचा नसून संपूर्ण कुटुंबाच्या पोटाचा आणि आरोग्याचा असतो ना!
सोपे स्नॅक्स
साहित्य - सारण - ३-४ उकडलेले बटाटे, १ बारीक चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, मीठ, आमचूर, लाल तिखट आणि आवरणसाठी - पापड.
कृती - उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून त्यात सारणाचं सर्व साहित्य घालून मिक्स करावं. एका पापडाचे दोन तुकडे करून ते ओल्या फडक्यात गुंडाळून ठेवावे. यामुळे ते मऊ पडतील. बटाट्याची भाजी त्या मऊ पापडात भरून त्याचा त्रिकोण बनवावा. त्रिकोणाचे काठ चिटकवण्यासाठी काठाला मैद्याची पेस्ट लावावी. तेल तापवून हे भरलेले त्रिकोण मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
केळ्याच्या पुर्या
साहित्य - ४ पिकलेली केळी, २ टे. स्पू. तेल, चिमूटभर मीठ, २ टे. स्पू. पिठीसाखर, मावेल तेवढी कणीक आणि तळण्याकरता तेल.
कृती - केळी कुस्करून घ्यावीत. त्यात तेल चवीपुरतं मीठ, पिठीसाखर घालावी. या मिश्रणात मावेल तेवढी कणीक घालून घट्टसर भिजवून घ्यावी. पिठाच्या गोळ्या करून पुर्या लाटून तेलात तळाव्यात. या पुर्या लोणच्याबरोबर खायला छान लागतात.
फ्रेंच फ्राईज
साहित्य - बटाटे, मीठ आणि तळायला तेल.
कृती - ४-५ बटाटे सोलून त्यांचे बोटांच्या आकाराचे तुकडे करावेत. हे तुकडे मिठाच्या पाण्यात टाकावेत. मग कपड्यावर पसरवून गरम तेलात तळावेत. टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावेत.
चॉकलेट फज
साहित्य - ५-६ टे. स्पू. लोणी, २ टे. स्पू. मध, २ टे. स्पू. कोको पावडर, ३ टे.स्पू.मिल्क पावडर, चवीप्रमाणे पिठीसाखर आणि १ कप बिस्किटांचा चुरा.
कृती - लोणी आणि मध एकत्र करून कोमट करावं. त्यात इतर सर्व पदार्थ घालून तेल लावलेल्या ट्रेमध्ये थापून फ्रीजमध्ये ठेवावे. मग कापून तुकडे करावेत.
पावाचा उपमा
कृती - पावाचे लहान तुकडे करावेत. त्याला जरासा पाण्याचा हात लावून ठेवावा. कांदा जाडसर चिरावा. हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरावी. कढईत तेल तापवून त्यात हिंग, मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि कांदा क्रमानं घालून परतावं. नंतर त्यात हळद, मीठ आणि साखर घालावी. पावाचे तुकडे घालून ते परतून घ्यावेत. परतावे. गॅस मंद करून कढईवर झाकण ठेवून एक वाफ आणावी.
कच्चे पोहे
कृती - मध्यम जाडसर पोहे पाण्यातून धुवून काढून भिजवावे. त्यात मीठ, साखर घालावी. नंतर उरलेले पदार्थ घालावे. हे झटपट तयार होणारे असून सर्व जण आवडीने खातात. लागल्यास वरून तेलात हिंग मोहरी कढीलिंबाची फोडणी करून त्यात मिक्स करावी.
बेक्ड पिझ्झा टोस्ट
कृती - टोमॅटो प्युरीमध्ये ब्रेड स्लाइसेस आणि लोणी सोडून सर्व साहित्य एकत्र करावं. एका ब्रेडस्लाइसवर लोणी लावून तयार मिश्रण पसरावं. ओव्हनमध्ये १८0 डिग्रीवर हे टोस्ट ५-६ मिनिटं बेक करावेत.
स्वीट ब्रेड
कृती - दुधात साखर विरघळून त्यात ब्रेड स्लाइसेस बुडवून काढून घ्यावी. नॉनस्टिक तव्यावर तूप सोडून ब्रेड स्लाइसेस दोन्ही बाजूंनी खरपूस भाजाव्यात. त्यावर जॅम लावून खायला द्याव्यात. हा पटकन होणारा नाश्ता सर्व जण आवडीनं खातात.
तिखट शेवया
कृती - तेल तापवून मोहरी कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यात चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्यांचे काप घालून परतावे. शेवया घालून त्याही परतून घ्याव्यात. मीठ-टोमॅटोचे काप, लिंबू, साखर सर्व टाकून गरजेप्रमाणे त्यात पाणी घालावं. शिजल्यावर त्यात कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव वरून पसरावा.
मिसी रोटी
कृती - वरील सर्व साहित्य एकत्र करून घट्ट कणीक भिजवावी. जाड पोळ्या लाटून तव्यावर मंद आचेवर गुलाबी भाजावी. साजूक तूप किंवा लोणीबरोबर खायला द्यावी.
मोड आलेल्या कडधान्याचे थालीपीठ
कृती - सर्व मोड आलेली कडधान्यं धुवून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावीत. त्यात गव्हाचा कोंडा, मीठ, तिखट आणि जिरेपूड घालून हे साहित्य मळून घ्यावं. थालिपीठ बनवून तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूनं शेकून घ्यावं. कडधान्यं आणि कोंड्यामुळे ही थालिपीठं पौष्टिक बनतात.
क्लब सँडविच
कृती - मिरपूड, मोहरीपूड आणि मीठ एकत्र करावं. ब्रेडला लोणी लावून घ्यावं. त्यावर चीज स्लाईस ठेवावं. नंतर बटाटा, टोमॅटो आणि काकडीच्या चकत्या ठेवून वरती मिक्स पूड पसरवून वर लोणी लावलेलं स्लाइस ठेवून ते दाबावं आणि त्याचे तिरके काप करावे.
गोड पोहे
साहित्य - २५0 ग्रॅम जाड पोहे, १ वाटी ओल्या नारळाचा चव, १ वाटी किसलेला गूळ, तूप, लवंग आणि ४-५ वेलचीची पूड.
कृती - पोहे धुवून घ्यावेत. १0 मिनिटं भिजवून ठेवावेत. कढईत ३-४ चमचे साजूक तुपात लवंगा तडतडल्यावर त्यात पोहे घालावेत. मग गूळ आणि नारळाचा चव घालावा. हे मिक्स करून चांगलं ढवळून झाकण ठेवावं. गूळ विरघळेपर्यंत वाफ आणावी. गोड पोहे हा एक वेगळा प्रकार नारळी भाताप्रमाणे लागतो. वरून वेलची पूड घालून पोहे चांगले हलवून ते गरमच खायला द्यावेत.
टोमॅटो ऑम्लेट
साहित्य - १ वाटी डाळीचं पीठ, १ वाटी मिरच्या, १ इंच आलं, १ टी. स्पू. जिरेपूड, चिरलेली कोथिंबीर, तेल, मीठ आणि लाल तिखट.कृती - टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरावी. आलं किसून घ्यावं. तेल सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करून घट्टसर पीठ भिजवावं. नॉनस्टिक पॅनवर तेल घालून त्यावर हे पीठ पसरवावं. बाजूनं तेल सोडावं. २ मिनिटं मंद आचेवर ठेवून दुसर्या बाजूनं पुन्हा शिजवावं. दोन्ही बाजूनं शिजून झाल्यावर ऑम्लेट तव्यावरून उतरवून सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावं.
तांदळाची/नाचणीची तिखट उकड
कृती - ताकात पाणी घालून त्यात पीठ आणि मीठ मिक्स करून त्याचं दाटसर मिश्रण करून घ्यावं. नंतर तेलात हिंग, मोहरी, लसणाचे काप, मिरचीचे काप परतून पिठाचं मिश्रण ओतावं. ते शिजत असताना एकसारखं ढवळून त्याच्या गुठळ्या फोडाव्या. नंतर झाकण ठेवून ते शिजवून घ्यावं. ही उकड गरमच खावी. आवडीप्रमाणे ही उकड घट्ट किंवा पातळ करता येते.
No comments:
Post a Comment